वसंतसागर वृत्तसेवा कुरळप :
स्थानिक पोलिस व नागरिकांमधील सलोखा वाढवण्यासाठी कुरळप पोलिस ठाण्याच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ईश्वरपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी (DySP) अरुण पाटील यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे, राज्य कार्याध्यक्ष शशिकांत नांगरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सदाभाऊ चांदणे तसेच प्रणव चांदणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांना खेळाची संधी मिळत असून समाजात शांतता व ऐक्याचा संदेश दिला जात आहे. पोलिस ठाण्याच्या या अभिनव उपक्रमाबद्दल नागरिकांकडून तसेच युवकांकडून विक्रम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.