वसंतसागर वृत्तसेवा कराड : 

         साहित्य, संस्कृती आणि विचारविनिमयाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या शब्दवेध संस्थेचा वर्धापन दिन मंगळवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सायंकाळी सहा वाजता महिला महाविद्यालय, मंगळवार पेठ, कराड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने नामवंत वक्ते ॲड. श्री सदानंद चिंगळे यांचे “जगणे आनंदाचे” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी जीवनशैली कशी स्वीकारावी, सकारात्मक दृष्टिकोन कसा निर्माण करावा तसेच साहित्य व संस्कृतीचा जीवनाशी असलेला संबंध यावर ते मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायंकाळी सहा ते साडेसहा या वेळेत सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होणार असून, साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शब्दवेध संस्थेच्या माध्यमातून साहित्य, कविता, कथा, विचारमंथन व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात वाचनसंस्कृती वाढविण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत नव्या उपक्रमांचीही दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

संस्थेच्या सर्व सदस्यांनी तसेच साहित्यप्रेमी मित्रमंडळींनी आपल्या सोबत दोन ते चार साहित्यप्रेमी मित्रांना घेऊन उपस्थित राहावे व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, अशी नम्र विनंती शब्दवेध संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.