वसंतसागर वृत्तसेवा बारामती : 


 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. बारामतीजवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले आहेत. फोनवरुन ही बातमी देताना युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार यांच्या निधनाची ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला चटका लावून जाणारी आहे.


*प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?*


विमान आकाशात घिरट्या घालत होतं, पण साधारण १०० फूट आधी ते विमान जोरात कोसळलं आणि विमानाने पेट घेतला. आम्ही त्या दिशेने धावलो पण तोपर्यंत विमानाचा चक्काचूर झाला होता, असं बारामतीतल्या एका माणसाने पाहिलं. तसंच एका महिलेने सांगितल्यानुसार, पहिल्यांदा विमान जेव्हा वरुन गेलं तेव्हा फिरून आलं, मग ते आणखी खाली आलं, त्यानंतर ते आणखी खाली आलं आणि धावपट्टीला चिकटलं. त्यानंतर अचानक मोठा आवाज होऊन स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर अनेक तुकडे उडाले, विमान तुटलेल्या अवस्थेत फिरलं. त्यानंतर स्फोट झाला. जागेवरच विमानाचा स्फोट झाला. असं एका शेतकरी महिलेने सांगितलं. विमानाचे अवशेष आमच्या घराजवळही पडले होते असंही या महिलेने सांगितलं.

 विमान आधी वर दिसलं होतं, नंतर खाली आलं आणि अचानक स्फोट झाला. असं प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं.


*अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला?*


राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जण होते आणि या सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंगदरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे सगळे दिल्लीहून बारामतीला रवाना झाले आहेत.