आनंदा सुतार वसंतसागर वृत्तसेवा मुंबई : सामाजिक कार्य, कामगार संघटनांचे नेतृत्व आणि राष्ट्रहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत डॉ. सागर प्रकाश घाडगे यांचे नाव Asian Book of World Records, UN Book of World Records आणि Bharat Book of World Records यांच्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी Esteemed Labour Leader & Visionary Social Reformer या मानाच्या श्रेणीमध्ये नामांकित करण्यात आले आहे.
अवघ्या ३६ व्या वर्षी भारत सरकारच्या ट्रेड युनियन्स ॲक्ट अंतर्गत नोंदणीकृत ४० हून अधिक प्रमुख कामगार संघटनांचे नेतृत्व व समन्वय साधण्याचा मान डॉ. घाडगे यांना लाभला आहे. कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देतानाच त्यांनी नैतिक प्रशासन, प्राणी कल्याण तसेच अमली पदार्थ, गुन्हेगारी आणि राष्ट्रविरोधी प्रवृत्तींविरोधात ठाम भूमिका घेत सामाजिक जनजागृतीचे कार्य सुरू ठेवले आहे.
या नामांकनामुळे डॉ. घाडगे यांच्या प्रगत नेतृत्वशैलीची, सामाजिक बांधिलकीची आणि राष्ट्रनिर्मितीप्रती असलेल्या कटिबद्धतेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. ॲड. वासंती जाधव , महेश पाटोळे आणि ॲड. पंडीत गायकवाड यांच्याकडून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले तसेच
त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक संस्था, कामगार संघटना आणि विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे ..
चौकट
“हे नामांकन माझ्या एकट्याचे नसून, माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, कामगार बांधव आणि समाजातील घटकांचे आहे,”
---कामगार नेते डॉ. सागर प्रकाश घाडगे यांनी व्यक्त केली आहे.