वारणावती 


 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात आणखी एका नव्या नर वाघाची नोंद झाली असून त्याला ‘STR T9’ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. स्थानिक गाईड मंडळींनी या वाघाचे नामकरण ‘शिलेदार’ असे केले आहे.हा नवीन नर वाघ गेल्या दोन महिन्यांपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरातील विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये सातत्याने दिसून येत असून त्याचे फोटो व व्हिडिओही प्राप्त झाले आहेत. सध्या हा T9 वाघ तारा (T5) या वाघिणीच्या क्षेत्रात तिच्या मागे फिरताना आढळत आहे.नव्या वाघाच्या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता सात झाली आहे. सध्या प्रकल्पात खालील वाघ नोंदणीकृत आहेत –

T1 सेनापती,T2 सुभेदार,T3 बाजी,T4 चंदा,T5 तारा,T6 हिरकणी,T9 शिलेदार.

सध्या तारा (T5) ह्या वाघिणीच्या क्षेत्रात तीन नर वाघ – T1 सेनापती, T2 सुभेदार आणि नव्याने दाखल झालेला T9 शिलेदार फिरत आहेत. त्यामुळे आगामी काळात तिच्या निवडीकडे वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.नव्या वाघाच्या आगमनामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील संवर्धन प्रयत्नांना अधिक बळ मिळाले असून भविष्यात येथे वाघांची संख्या वाढण्याची शक्यता वन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

चौकट 


 या घडामोडीचे स्वागत करत, ही प्रकल्पासाठी अत्यंत आनंदाची बाब असून या माध्यमातून सह्याद्रीतील जैवविविधता अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहे.

 -.  तुषार चव्हाण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक


कोट 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणारे राधानगरी तसेच तिलारी-दोडामार्ग येथील जंगल क्षेत्र व कॉरिडॉर वाघांच्या हालचाली व प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.


- मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे