, फलटण-पुसेगाव रोड येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील दादासाहेब गायकवाड यांना शासनमान्य मंजुरीनंतर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेला हिंदुस्तान पेट्रोलियमचा पेट्रोल पंप ताब्यात देण्यात आला होता. मात्र पंप सुरू होण्यापूर्वीच दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी काही व्यक्तींनी जमाव करून जातिवाचक शिवीगाळ केली, मुख्य रस्ता काटेरी तारेने अडवून आर्थिक नुकसान केले, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.या संदर्भात गायकवाड यांनी ९ सप्टेंबर २०२४ रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये, 26 सप्टेंबर 2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्याकडे आणि 24 ऑक्टोबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक सातारा येथे तक्रारी दाखल केल्या. तथापि, कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अर्ज क्र. 32/2025 अंतर्गत विशेष न्यायालय, फलटण येथे धाव घेतली.

  न्यायालयाने सर्व कागदपत्रे व पुरावे तपासून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता कलम 175(3) नुसार संबंधित आरोपींवर एफ.आय.आर. नोंदविण्याचे स्पष्ट आदेश फलटण ग्रामीण पोलिसांना दिले आहेत. तसेच 15 डिसेंबर 2025 पर्यंत चौकशी अहवाल न्यायालयास सादर करण्याचे निर्देश दिले.या प्रकरणी अर्जदार गायकवाड यांच्यातर्फे ॲड. बापूसाहेब शिलवंत व ॲड. अजीम मेटकरी यांनी जोरदार व तथ्यपूर्ण मांडणी केली.

“ही घटना केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून, कायद्याने व्यवसाय करण्याचा अधिकार मिळवलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकावरील गंभीर अत्याचार आहे,” असे मत ॲड. बापूसाहेब शिलवंत यांनी न्यायालयात मांडले.न्यायालयाच्या आदेशामुळे टिकून राहिलेल्या तक्रारीला न्याय मिळाला असून आता पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवणे बंधनकारक झाले आहे. पुढील तपास न्यायालयीन मार्गदर्शनाखाली होणार आहे.